| पनवेल | वार्ताहर |
बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारुन अटक केली. या कारवाईत पकडण्यात आलेल्यांमध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश असून, सदर सर्व बांग्लादेशी नागरिक बांधकाम साईटवर मजुरी करुन तसेच घरकाम करुन मागील आठ महिन्यांपासून उलवे मध्ये राहात असल्याचे तपासात आढळून आले आहे.
उलवे, सेक्टर- 17 मधील साई यश बिल्डींगमध्ये काही बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांनी सदर बांग्लादेशी नागरिकांना पकडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार कोना नवाब शेख (32), रानी चांदु शेख (20), बिस्टी नोयन शेख (20), शावन अजार हलदर (मुसा) (39), नोयन मोहसीन शेख (23), मोहम्मद हैदरअली शेख (26), साजन अजहार हलदर (39) आणि मोहसीन अब्दुल रहिमान शेख (64) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
उलवे मधील आठ बांगलादेशींना अटक
