धाकटी पंढरी, वरसोलीत भाविकांची गर्दी
। खोपोली/अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विठूनामाच्या जयघोषात रायगडात शुक्रवारी कार्तिकी एकादशीचा अनुपम सोहळा उत्साहात साजरा झाला.धाकटी पंढरी,वरसोली आदी प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती.तब्बल दोन वर्षानंतर साजगाव येथील यात्रा भरल्याने भाविकांचा उत्साह दुणावला आहे.
साजगांव) येथे माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील यांच्या कुटूंबाला पालखीचा मान मिळाला. पहाटे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा प्रसाद थोरवे आणि सौ.थोरवे यांच्या हस्ते करण्यात आली.साजगाव यात्रा विविध कारणांसाठी प्रसिद्ध आहे. यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक यात्रेत येत विठ्ठलाचा दर्शन घेत यात्रेतील प्रसिद्ध गरमागरम जिलेबीचा अस्वाद घेतात. यात्रेतील जिलेबीसह,सुखी मासळी प्रसिद्ध आहे असून आकाश पाळणे,मौत का कुआँ,जादुचे प्रयोग,कटलरी,लहान मुलांची खेळणी,हाँटेल,चायनिज अशी दुकाने मंदिराच्या पायथ्याशी काही एकरात सुरू बसली आहे.
यात्रेचे नियोजन व नियंत्रण खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी,प्रशासक अनुप दुरे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुधीर पाटील, यात्रा कमिटी अध्यक्ष अतुल पाटील, पोलिस निरीक्षक शिरिष पवार यांच्या संयुक्त सहकार्यातून करण्यात आले आहे.
वरसोलीत दर्शनासाठी रांग
वरसोली येथे आंग्रेकालीन विठ्ठल मंदिरातही पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकानी मोठी गर्दी केली होती.भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान व्यवस्थापनाकडून विविध सुविधा पुरविण्यात आल्या.आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता.