मोहोपाडा स्मृती चषकात एकता कांबे संघ अव्वल


| रसायनी | वार्ताहर |

श्री गणेश युवक क्रीडा मंडळ व अविष्कार क्रिकेट क्लब मोहोपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोपाडा येथील बाळासाहेब ठाकरे पटांगणावर सार्थंक खराडे, विशाल खराडे, अमर धुरव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चार दिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन सुरेश म्हात्रे, संदिप मुंढे, रोशन राऊत, प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला माजी आ. मनोहर भोईंर, रमेश पाटील, निलम पाटील, अजित सावंत यांनी भेट दिली.

या स्पर्धेत एकता कांबे, वावेघर रसायनी, गावदेवी वयाल संघाने उपांत्य फेरीत मजल मारली. यात चौथ्या दिवशी अंतिम सामन्यात एकता कांबे आणि गावदेवी वयाल यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यात एकता कांबे संघ अव्वल ठरला. त्यांना प्रथम क्रमाकाचे 40,000 हजार रुपयाचे पारितोषिक व स्मृतिचषक देण्यात आले. तर व्दितीय क्रमाकाचे 20,000 हजार व स्मृतिचस्षक गावदेवी वयाल संघाने पटकावला. तृतीय क्रमाक वावेघर व चतुर्थ क्रमाक मरीआई जांभिवली संघाने पटकावला.

या सामन्यात मालिकावीर मान सार्थक माळी, उत्कृष्ट गोलंदाज महेश म्हात्रे ,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कुमार चव्हाण यांना देण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर, दिपक कांबळी, गजानन मांडे, प्रकाश गायकवाड, रसिका खराडे, विलास गुंडले आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version