| भाकरवड वार्ताहर | जीवन पाटील |
शहाबाज हद्दीतील चौकीचापाडा वाळवडे यांच्या बी नवजवान सेवा मंडळाच्या वतीने तीर्थक्षेत्र एकविरा येथे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्राचे यंदाचे 7 वे वर्षे असून या पदयात्रेत जवळजवळ दोनशे हुन अधिक सभासद सहभागी झाले होते. पालखी सोहळ्यात अबदागिरी ,छत्री निशाण पूजन ग्रामदेवता गावदेवीचे विधिवत पूजन, महाआरती, तसेच या पदयात्रेसाठी ज्या मान्यवरांनी सढळ हस्ते मदत रूपाने सेवा दिली. त्या मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला.पालखी चे अध्यक्ष श्री संदीप पाटील, उपाध्यक्ष अक्षय तरे, कार्याध्यक्ष अमित जुईकर, कार्यवाह रोहित जुईकर, आकाश पाटील, पालखी प्रमुख मार्गदर्शक आदिनाथ म्हात्रे, सल्लागार देवेंद्र म्हात्रे, सेक्रेटरी निश्चल म्हात्रे, उपसेक्रेटरी प्रशाद म्हात्रे , विवेक जुईकर, हिशेब तपासणी स निर्भय जुईकर ,शॉरभ जुईकर, व्यवस्था पक धनंजय जुईकर, उदय म्हात्रे, राजन तरे, ओंकार पाटील आदी या पदयात्रेत सहभागी झालेले आहेत.