चौकमध्ये एकविरा पालखीचे स्वागत

| चौक | वार्ताहर |

दरवर्षीप्रमाणे आई एकविरा चैत्र सप्तमी पालखी आपटा ते श्रीक्षेत्र कार्ला सोहळा चौक मार्गावरून रविवारी (दि.26) सकाळी 10:30 वाजता चौक येथे प्रस्थान झाले. बाजारातील कोल्हापूर पेठेत पालखीचे मोठ्या थाटामाटात व जल्लोषात फटाक्यांच्या अतिशबाजीत ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. प्रत्येक नाक्या नाक्यावर देवीच्या भक्तांनी रांगोळीचे सडे टाकून एकविरा देवीचे स्वागत केले. जागोजागी नाश्ता, लस्सी, ज्यूस, थंड पाण्याची सोय करण्यात आली होती. आदर्श मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आलेल्या पालखीच्या भोईंचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

चौक सरपंच रितू ठोंबरे, सुभाष पवार, निखिल मालुसरे, मोनिका दबके, नयना झिंगे, रीना सोनटक्के, फिरोज शेख, स्वप्निल सोनटक्के, अजय म्हामुणकर, केदार दादा भगत, आनंद गायकवाड, सिकंदर शेख, किशोर मालुसरे, मंडळाचे अध्यक्ष वसंत मालुसरे तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. शैलीत महागावकर यांनी उपस्थितांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात महिला मंडळांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.

Exit mobile version