ट्रेलरच्या धडकेने वृद्ध इसमाचा मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।
भरधाव ट्रेलरच्या धडकेने होंडा ऍक्टिवा स्कुटीवरील चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना तालुक्यातील कोन पोलीस चौकी समोरील रस्त्यावर घडली आहे. बाळाराम बाबरे (वय 71) हे त्यांच्या ताब्यातील होंडा ऍक्टिवा स्कुटी दुचाकी वाहन घेऊन कोन पोलीस चौकी जवळील रस्त्यावरून जात असताना भरधाव ट्रेलरने दिलेल्या धडकेमुळे ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version