। खेड । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील कुरवळ, निरकरवाडी येथील शेतात तुटून पडलेल्या विद्युततारेचा स्पर्श होऊन इंदिराबाई विठोबा लाड या वृध्देचा मृत्यू झाला. या घटनेने महावितरणच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. इंदिराबाई आपल्या शेतातून जात असता शेतात असलेल्या पोलवरील तारा खाली तुटून पडल्या होत्या. त्यातून वीजप्रवाह चालू होता. तेथून जाताना इंदिराबाई यांना तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला होता.