वृद्ध महिलेची फसवणूक

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809

| पनवेल | प्रतिनिधी |

80 वर्षीय महिलेला दोन अनोळखी व्यक्तींनी कपडे, पैसे आणि खाऊ देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामूबाई बाळाराम घरत या खारकोपर येथे राहत असून, त्या शिवाजी चौक, पनवेल येथे घरातील किराणा मालाचा बाजार खरेदीसाठी आल्या होत्या. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना कपडे, पैसे आणि खाऊ देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांच्या गळ्यातील दागिने पिशवीत काढण्यास सांगितले आणि बिस्कीट पुडे पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने पिशवीतून त्यांचे दागिने आणि पैसे काढून घेऊन त्यांची फसवणूक केली.

Exit mobile version