| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून चोरीच्या उद्देशाने करण्यात आलेल्या हल्ल्यात त्या महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालवणजवळ कट्टा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रोहिणी गुराम असं हत्या करण्यात आलेला वृद्ध महिलेचे नाव आहे.
दोन दिवसांपूर्वी कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसले. यावेळी त्यांनी अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेवर हल्ला केला व यातच त्या महिलेचा मृत्यू झाला. हा हल्ला केल्यावर ते तिथून पळून गेले होते. हा सगळा गंभीर प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना या सगळ्याची माहिती देत तात्काळ या महिलेला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र दोन दिवसापूर्वी उपचारादरम्यान या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. मालवण पोलिसांनी संशयित चोरट्याविरोधात खून आणि घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असताना बुधवारी सकाळी कुणकवळे कुपेरीची घाटी परिसरात जळालेले कपडे व अन्य साहित्य पोलिसांना आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र हे साहित्य या खून प्रकरणातील आहे की कसे, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
चोरट्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606