| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं आहे. मात्र, आता येत्या 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक जारी केलं आहे. निवडणूक आयोगाच्या परिपत्रकारनुसार, 7 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. तर, 21 ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी अर्जांची छाननी होईल. तसेच 25 ऑगस्टपर्यंत ही उमेदवारी मागे घेता येणार आहे. यावेळी एकापेक्षा जास्त अर्ज वैध ठरल्यास 9 सप्टेंबरला रोजी मतदान आणि त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.







