देवेंद्रनाथ पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथील देवेंद्रनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अशोक प्रधान व उपाध्यक्षपदी ज्योत्स्ना तांडेल यांची पुढील पाच वर्षासाठी निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी माधव भाटकर यांच्या अधिकारात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. संचालक म्हणून मकरंद कर्णिक, महेश कर्णिक, विजय जैन, वैभव प्रधान, डॉ. विनायक पाटील, सचिन ढवळे, राजेंद्र होळीकेरी, सीमा सोनी, तेजस्विनी प्रधान यांची बिनविरोध निवड झाल्याचे श्री. भाटकर साहेब यांनी जाहीर केले व सर्व नवनिर्वाचित संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

संस्थेने आता पर्यंत एकत्रित 32 कोटीच्या व्यवहाराचा टप्पा गाठला असून, रौप्यमहोत्सवी वर्षापर्यंत 50 कोटींच्या व्यवसायाचे लक्ष निश्‍चित करण्यात यावे, असे आवाहन तज्ञ संचालक सतिश प्रधान यांनी केले. संस्थेचे कारभार लोकामिभिख असून संस्था गेली 12 वर्षे सर्वाधिक 15% लाभांश देत आलेली आहे, अशी माहिती उपस्थित मावळत्या संचालिका माधुरी प्रधान यांनी दिली व नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version