गणेश कोळी यांची अध्यक्षपदी निवड

| पनवेल | प्रतिनिधी |
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी तर केंद्रीय सचिव पदी बाळकृष्ण कासार यांची निवड विश्रामगृह पनवेल येथे झालेल्या सभेत करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थापक यासिन पटेल होते. सक्रिय पत्रकार व पत्रकार मित्र असलेले सामाजिक कार्यकर्ते यांचा व्यापक सहभाग या संघटनेत आहे.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किरण बाथम, मुंबई अध्यक्ष निसार अली सय्यद, राहुल कुलट, समीर तांबोळी, अभिमन्यू लोंढे, गोविंद सिंग राजपूत, मतीन खान, या वेळी अकोला, बुलढाणा, सांगली, कोकण, मुंबईसह अनेक पत्रकार मोठया संख्येने पत्रकार सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version