| नागोठणे | वार्ताहर |
विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या बौद्धजन पंचायत समिती, मुंबईच्या रोहा तालुक्यातील नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 ची नवीन कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली आहे. त्यानुसार नागोठणे शाखेच्या अध्यक्षपदी आयु. किसन धर्मा शिर्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष आयु.निलेश शेलार, सचिव आयु. विकास जाधव, सहसचिव आयु. विलास कांबळे, कोषाध्यक्ष आयु. मनोहर शेलार, कार्याध्यक्ष आयु.एस.एन.गायकवाड, उपकार्याध्यक्ष आयु.रमेश गायकवाड, सदस्य सल्लागार आयु.जितेंद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह, नागोठणेच्या व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष ॲड. प्रकाश कांबळे, सचिव आयु. दिलीप दाभाडे, व्यवस्थापक आयु. सुदिन शिर्के यांची निवड करण्यात आली आहे.