| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी आपला नगराध्यक्षपदाचा ठरल्याप्रमाणे अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नुकताच जिल्हाधिकार्यांकडे राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केला असून, दि.4 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र माणगाव नगरपंचायत कार्यालय सभागृहात अधिकार्यांकडे दाखल करायचे आहेत. या निवडणुकीचा कार्यक्रम नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे शुक्रवार दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत, निवडणुकीचे पिठासन अधिकारी यांच्याकडून नामनिर्देशन अर्जाची छाननी दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 नंतर, नामनिर्देशन पत्रे फेटाळण्यात आलेली आहेत. त्या उमेदवारांची नावे आणि नामनिर्देशन पत्रे फेटाळण्याची करणे सूचना फलकावर प्रसिद्ध करणे दि.27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत, पिठासन अधिकार्याचे निर्णयाविरुद्ध अपील दाखल करण्याचा कालावधी शुक्रवार दि.27 सप्टेंबर सायंकाळी 5 पासून ते मंगळवार दि. 1 ऑक्टोबर 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत, वैध नामनिर्देशन पत्राची यादी सूचना फलकावर प्रसिद्ध करणे दि.1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यानंतर, उमेदवारी मागे घेणे दि.3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे (वर्णानुक्रमे)दि.3 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 नंतर, अध्यक्षपदासाठी निवडणूक विशेष सभा दिनांक व वेळ दि.4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता, निवडणूक लढविणार्या व उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे विशेष सभेत वाचून दाखविणे 12 वाजून 5 मिनिटानंतर, अध्यक्ष पदाची निवडणूक घेणे व निकाल घोषित करणे दि. 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजून 10 मिनिटानंतर असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.