शिवधन पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

चेअरमनपदी गणेश म्हात्रे यांचा षटकार

| चिरने | वार्ताहर |

उरण तालुक्यातील चिरनेर येथील शिवधन ग्रामीण सहकारी पतपेढी मर्यादित पतसंस्थेच्या सन 2022 -23 ते सन 2027-28 या पंचवार्षिक कालावधीकरिता घेण्यात आलेली निवडणूक ही पतसंस्थेच्या संचालक मंडळासह चेअरमनपदाची आणि व्हाईस चेअरमनपदाची निवडणूक ही बिनविरोध पार पडली. दरम्यान, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी शुक्रवार दि. 7 पतसंस्थेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी चेअरमनपदासाठी गणेश म्हात्रे आणि व्हाईस चेअरमन पदासाठी गजानन वशेणीकर यांचे अर्ज सादर झाले.

दरम्यान, पतसंस्थेच्या अन्य संचालकांमधून कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे दोन्ही पदांची निवडणूक ही निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक राजेंद्र गायकवाड यांनी बिनविरोध जाहीर केली. यात गणेश म्हात्रे यांची चेअरमनपदी सलग सहाव्यांदा, तर गजानन वशेणीकर यांची व्हाईस चेअरमनपदी तिसर्‍यांदा निवड झाली आहे.

संचालक पदावर विलास ठाकूर, अशोक फोफेरकर, अनंत पाटील, दीपक पाटील, दत्तात्रेय म्हात्रे, विवेक केणी, अमित चिरनेरकर, रेणुका ठाकूर व रंजना म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल, निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक राजेंद्र गायकवाड, अरुण ठाकूर, सदानंद पाटील, समाधान ठाकूर, शामकांत ठाकूर, प्रभाकर ठाकूर, दिपक खारपाटील, विलास भगत, शुभांगी महाले, संध्या पाटील, ज्योती म्हात्रे, श्रीधर पाटील, श्री. कदम, स्वाती म्हात्रे, धनेश ठाकूर, दर्शन जोशी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक व्हाईस चेअरमन गजानन वशेणीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले. या कार्यक्रमाला भागधारकांसह ठेवीदार, ग्रामस्थ व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version