। उरण । वार्ताहर ।
मावळ लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. मावळ मतदारसंघात उरण, पनवेल, कर्जत खालापूर, पिंपरी चिंचवड व मावळ हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील उरण हा एक महत्वाचा मतदारसंघ या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार, अप्पर तहसिलदार जितेंद्र इंगळे, अप्पर महमिन्दार शेतजमीर अर्चना प्रधान व उरणचे तहसिलदार उध्दव कदम यांच्या देखरेखीखाली ईव्हीएम मशिन्स तयार करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
मावळ मतदारसंघात एकूण 33 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असून त्यानूसार 33 उमेदवार व 1 नोटा अशा एकूण 34 मतपत्रिका ईटीएम मशीनला जोडणे, व्हीव्हीपॅट मशीनमध्ये निवडणूक चिन्ह लोडींग करणे व प्रत्येक मशीनमधील प्रत्येक बटणाची तांत्रिक चाचणी घेण्याची प्रक्रीया सुरु आहे. तसेच, सर्व ईव्हीएम मशिन्स सिल करून स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित पोलीस बंदोबस्तात ठेवल्या जात आहेत. त्यानंतर मतदानाच्या 1 दिवस आधी 12 मे रोजी सर्व ईव्हीएम मशिन्स रवाना केल्या जाणार आहेत.
उरण विधानसभा मतदारसंघात एकूण 344 मतदान केंद्र आहेत. तर, सुमारे 3 लाख 19 हजार, 211 नागरीक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या अनुषंगाने 2065 अधिकारी कर्मचायांची निवडणूक प्रक्रीयेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. स्ट्रॉग रुमच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांना ही प्रक्रीया बघायची आहे त्यांना ओळखपत्र बंधनकारक ठेवण्यात आले आहे. उरण विधानसभा मतदारसंघासाठी 344 मतदान केंद्रावर इच्हीएम मशिनमध्ये एकूण 344 व्हीव्हीपट मशिन्स, 344 कंट्रोल युनिट व 1032 बॅलेट युनिटचा समावेश आहे. या मशिन्सची तांत्रिक चाचणी व आढावा सहाय्यक निवडणूक निर्णय व उपजिल्हाधिकारी जनार्दन कासार, अप्पर तहसिलदार जितेंद्र इंगळे, तहसिलदार उद्धव कदम यांच्या माध्यमातून घेतला जात आहे.
मावळ मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरू
