। लातूर । प्रतिनिधी ।
लातुर जिल्ह्यातील चार नगर पंचायतीच्या एकूण 52 जागेसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील चाकूर, जळकोट, देवणी आणि शिरूर अनंतपाळ या नगर पंचायतीचे मतदान होत आहे. या निवडणूक प्रचारात भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचाराचा धुराळा उडवला होता. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील राजकीय समीकरण बदलले आहे.
मंडणगड-दापोली नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू
रत्नागिरीतील मंडणगड-दापोली नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील वादामुळे या निवडणुकीतील शिवसेनेच्या कामगिरीकडे लक्ष अनेकांचे लक्ष लागले आहे.