चालत्या दुचाकीवर कोसळला विजेचा खांब

। संगमेश्वर । प्रतिनिधी ।

संगमेश्वर तालुक्यात चालत्या दुचाकीवर विजेचा खांब आणि विद्युतवाहिनी पडली. सुदैवाने वीज नसल्याने दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे.

संगमेश्वर तालुक्यातील पोचरी येथे गुरूवारी (दि. ०१) सकाळी हि घटना घडली. फुणगूस खाडीभागातील पोचरी येथील ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग धामणे (४५) हे दुचाकीवरून जात असताना वाघजाई मंदिर या ठिकाणी अचानक झाडाची फांदी विद्युतभारीत वाहिनीवर पडल्याने विजेचा सिमेंट खांब खेचला जाऊन विद्युतवाहिनी व खांब धामणे यांच्या चालत्या दुचाकीवर पडला. त्यामुळे दुचाकीसह पांडुरंग धामणे रस्त्यावर कोसळले. सुदैवाने, खांब कोसळण्यापूर्वी वीजप्रवाह खंडित झाला होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, धामणे किरकोळ जखमी झाल्याने त्यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले.

Exit mobile version