पालीतील विद्युत खांब धोकादायक

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

शहराचे डम्पिंग ग्राउंड हे टेंबी वसाहतीजवळ आहे. येथील रस्त्यावर असलेला एक विद्युत खांब धोकादायक झाला आहे. तो खाली गंजून जीर्ण होऊन वाकला आहे. परिणामी वारा पावसामध्ये तो कधीही कोसळू शकतो. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. हा रस्ता शिळोशी व मढाळी गावांनादेखील जोडतो. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. अशावेळी हा विद्युत खांब कोसळल्यास अपघात घडू शकतो. त्यामुळे हा विद्युत खांब लागलीच दुरुस्त करावा किंवा या जागी दुसरा खांब बसवण्यात यावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. याशिवाय नगरपंचायतचे सफाई कर्मचारी या ठिकाणी नियमित कचरा टाकण्यासाठी येतात. त्यांनाही या खांबापासून धोका संभवतो.

Exit mobile version