घोषणांचा सुकाळ; पंजाबमध्ये वीज 3 रुपये स्वस्त

| अमृतसर | वृत्तसंस्था |
पंजाबमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारनं वीज दरात 3 रुपये प्रति यूनिट कपात केली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मुख्यमंत्री चन्नी यांच्या अनेक घोषणा शेअर केल्या आहेत. यात सरकारी कर्मचार्‍यांचा वाढीव महागाई भत्ता आणि शेतकर्‍यांसाठी उचलण्यात आलेल्या महत्वाच्या पावलांची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री चन्नी यांनी काही दिवसांपूर्वीच गोशाळांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच सोलर यंत्रणा बसवण्यासाठी गोशाळांना 5 लाख रुपये दिले जातील.

Exit mobile version