| आगरदांडा | प्रतिनिधी |
कल्याण भरारी पथकातील एजन्सी, मुरुड महावितरण कंपीनी अधिकारी व कर्मचारी यांनी मुरुड बाजारपेठेतील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स महावीर दुकानातील व घरातील वीज मीटरची तपासणी केली. यावेळी घरासाठी व व्यापारासाठी लावण्यात आलेल्या वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे मुरूड महावितरण कंपनी विभागाचे प्रभारी सहाय्य्क अभियंता सतीश खरात यांनी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण भरारी पथकांतील एजन्सी, मुरुड महावितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे शुक्रवारी (दि.16) मुरुड बाजारपेठेतील दुकानांतील व घरगुती मीटरची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान महावीर फर्निचर व इलेक्टरीनिक्स दुकानामध्ये व त्याच्यावरती राहत असलेल्या दुमजली घरामध्ये अनधिकृत वीज वापर करीत असल्याचे आढळून आले. प्रत्यक्ष वीज मीटर तपासणी करीत असताना घरातील व दुकानातील वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करीत असल्याचे आढळून आले आहे. त्याप्रमाणे या वीज चोरीच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास मुरुड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. दुकानातील वीज चोरी दंड सुमारे 1 लाख 95 हजार व घरातील वीज चोरी दंड सुमारे सहा लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. याबाबतची माहिती मुरुड महावितरण कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता कृष्णात सूर्यवंशी यांनी दिली आहे.







