रोह्यात वीज कर्मचारी भाजला

| रोहा | प्रतिनिधी |
रोहा शहरालगत असणार्‍या म्हाडा कॉलनी येथे खांबावर चढून काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने विशाल लांगी हा कर्मचारी तीस टक्के भाजला आहे. त्याला पुढील उपचारासाठी ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत असल्याची माहिती रोहा शहर अभियंता गावित यांनी दिली आहे.


मंगळवारी सकाळी 10 ते 12.30 यावेळेत रोहा शहराचा वीज पुरवठा बंद करून मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे करण्यात येत होती.लांगी यांच्यासोबत असणारा त्याचा अन्य सहकारी फोनवर बोलत असताना लांगी हा दुरुस्तीच्या कामासाठी खांबावर गेला. परंतु तोपर्यंत खंडित वीज पुरवठा सुरू करण्यात आला होता. यामुळे विजेचा तीव्र धक्का लागून सदर वीज कर्मचारी खाली कोसळला. या दुर्घटनेत संबंधित कर्मचारी तीस टक्के भाजला असून त्याच्या खांद्याला तसेच पाठीला मार बसला आहे.सदर दुर्घटनेत कोणाचा निष्काळजीपणा भोवला याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

Exit mobile version