| तळा | वार्ताहर |
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे बालविकास व प्राथमिक विद्यामंदिर, गो. म. वेदक विद्यामंदिर आणि कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाचे वार्षिक स्नेह संमेलन गगनभरारी 2023 उत्साहात पार पडले. यावेळी आदर्श विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्राथमिक विभागातून आदर्श विद्यार्थिनी रुबी गोठेकर व आरव सुर्वे तर आदर्श शिक्षक म्हणून नितेश साबळे यांचा गौरव करण्यात आला.
गो म वेदक विद्यामंदिरचे आदर्श विद्यार्थी समृद्धी साळुंखे व मसूद रहाटविलकर तर आदर्श शिक्षिका म्हणून प्रेरणा राजपूरकर यांचा गौरव करण्यात आला.कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे आदर्श विद्यार्थी कला शाखेतून रितेश नागे, मयुरी देवकर, वाणिज्य शाखेतून जान्हवी मिसाळ व अहमद खानदेशी, विज्ञान शाखेतून कार्तिक पाटील व शमा कुरुक्कर तर आदर्श शिक्षक म्हणून सर्जे व्ही. बी. यांचा गौरव करण्यात आला. तसेच विविध क्रीडा स्पर्धा शालेय व सहशालेय उपक्रमांत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्याशाखेचे स्नेहसंमेलन
