इको सेन्सेटिव्ह झोनविरोधात एल्गार

रोह्यातील शेतकऱ्यांकडून शासनाला हरकतींचे निवेदन

| खांब | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात इको सेन्सेटिव्ह झोन लागू करण्यात येणार असल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला असून, रायगड जिल्ह्यातील तब्बल 437 गावे ही इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्याचे केंद्र शासनाच्या मसुद्यामध्ये आहे. तर त्यात रोहा तालुक्यातील 119 गावांना वन व पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे संवेदनशील गावे म्हणून घोषित करत असून, यात धाणमणसई पंचक्रोशीतील गावांचाही समावेश आहे. या अनुषंगाने यावर हरकती घेत विभागातील शेतकरी ग्रामस्थांवर लादले जात असलेले वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र हे रद्द करण्यात यावे यासाठी मंगळवारी, (दि.12) तहसीलदार, प्रांत अधिकारी व वन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी विभागातील गावागावातून मोठ्या संख्येने शेतकरी ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवत वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित रद्द करण्याबाबत हरकत घेऊन निवेदन दिले. केद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पर्यावरण संवेदनशिल क्षेत्र घोषित करण्यासाठी जारी केलेली मसुदा अधिसुचना. तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सचिव महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्रान्वये अधिसुचनेनुसार केंद्र शासनाचे पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी पर्यावरण संवेदनशिल क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसुचना प्रसिध्द केली आहे.

रोहा तालुक्यातील एकूण 119 गावांना ही अधिसूचना लागु करण्यासाठी जारी केली आहे. त्यावर विरोध दर्शवित तसेच येथील बळीराजा शेतकरी यांची देखील हरकत असून, हे केंद्रीय वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र रद्द करण्यात यावा, असे निवेदन रोहा तालुक्यातील धामणसई पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपल्या हरकतीबाबत तहसीलदार, प्रांत अधिकारी व वन अधिकारी यांना देत याबाबत रोहा तहसीलदार, प्रांताधिकारी, उपवन संरक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन सदरील झोन रद्द करण्याची आग्रही मागणी येथील ग्रामस्थानी केली.

Exit mobile version