अशैक्षणिक कामाविरोधात शिक्षक संघटनेचा एल्गार

सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय, शिक्षण संचालकांना निवेदन


| माणगाव | वार्ताहर |

नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सध्या सर्वत्र सर्वेक्षण केले जात आहे. पण हे अशैक्षणिक काम असून जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना सदर सर्वेक्षणाचे आदेश दिले गेले आहेत. त्याच्याविरोधात शिक्षक दि. 12 सप्टेंबर रोजी शिक्षण संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी दिला आहे. तसेच याबाबत शिक्षण संचालकांना निवेदन देण्यात आले आहे.

मध्यवर्ती संघटनेनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना यांना निरीक्षर सर्वेक्षण करण्याचे आदेश आहेत. शैक्षणिक सर्वेक्षणाच्या नावाखाली अशैक्षणिक सर्वेक्षणाचे काम शिक्षकाकडून करून घेण्याची शासनाची भूमिका आहे पण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच प्राधान्य देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांची याबाबत भेट आपली भूमिका स्पष्ट केली आहे . शालेय पोषण आहार योजना 5 वर्षाची, ऑडिट 15 जून रोजी शाळा सुरू झाली आहे. 5 सप्टेंबर पर्यंत जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सहा परीक्षांना सामोरे जावे लागले आहे. त्या परीक्षांचा निकाल तयार करणे, सातत्याने ऑनलाईन लिंक भरणे, बिएलची कामे शिक्षकांच्या माथी मारली आहेत. अनेक शाळांमध्ये शिक्षक संख्या अपुरी आहे. केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, पदोन्नती मुख्याध्यापक पदे रिक्त आहेत यामुळे शिक्षक वर्ग मेटाकुटीला आले आहे. राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगाचे हप्ते मिळाले मात्र जिल्हा परिषद शिक्षकांना 2 रा, 3 रा, आणि 4 था हप्ता मिळालेला नाही. दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अंशदान उपदान मिळालेलं नाही. गेली तीन वर्षा वैद्यकीय परिपूर्ती रक्कम मिळालेली नाही, तसेच ऑफलाइन देयकासाठी निधी यामुळे शिक्षक वर्गामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे . 12 सप्टेंबरला होणाऱ्या शिक्षण संचालक कार्यालयासमोर होणाऱ्या उपोषणास राज्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी केले आहे.

Exit mobile version