महानगरपालिकेच्यावतीने आपतकालीन कार्य सुरू

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 06 जुलै रोजी रात्री 2.00 पासून मुसळधार पाऊस पडत आहे. दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 07.00 वाजेपर्यंत सुमारे 121 मिमि पाऊस महापालिका कार्यक्षेत्रात झाला आहे. पनवेल महानगरपालिकेमार्फत आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. या कक्षामार्फत एकुण 1200 मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार आपतकालीन पुरस्थिती नियंत्रित करण्याकरीता आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रभागामध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पंपिंग मशीन बसविण्यात आले असून साचलेल्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करण्यात येत आहे. महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती-क पनवेल कार्यक्षेत्रातील पटेल मोहल्ला येथील 70 पुरग्रस्त नागरीकांना पमपा उर्दू शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. पनवेल कोळीवाडा येथील 90 पुरग्रस्त नागरीकांना पमपा कोळीवाडा शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. सदर पुरग्रस्त नागरीकांना पमपा मार्फत चहा पाणी व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती-ब कार्यक्षेत्रातील रोडपाली आदिवासी वाडीतील 60 घरे पाण्याखाली गेले असून सदर 250 पुरग्रस्त नागरीकांना रोडपाली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. सदर पुरग्रस्त नागरीकांना पमपा मार्फत चहा पाणी व जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. कळंबोली प्रभागामध्ये पाण्याचा निचरा होणेसाठी एकुण 27 ठिकाणी पंप चालू असून त्यामार्फत पाण्याचा निचरा करण्यात आली आहे. सदर ठिकाणी पनवेल महानगरपलिकेमार्फत 450 कर्मचारी काम करीत आहेत.

दरम्यान, पमपा हद्दीतील पडघे गावातील मुख्य प्रवाहाच्या नाल्यातील पावसाचा प्रवाह कमी झालेला आहे. खारघर प्रभागामध्ये पाण्याचा निचरा होणेसाठी एकुण 14 पंप चालू असून त्यामार्फत पाण्याचा निचरा करण्यात येत आहे.सदर ठिकाणी पनवेल महानगरपलिकेमार्फत कर्मचारी काम करीत आहेत. खारघर प्रभागामधील उप विभाग नावडे विभागात पाण्याचा निचरा होणेसाठी एकुण 05 पंप चालू असून एका ठिकाणी जेसीबीमार्फत पाण्याचा निचरा करण्यात येत आहे.

Exit mobile version