जैन भगिनीवर भावपूर्ण अंत्यसंस्कार

| कर्जत | वार्ताहर |

खोपोलीहून कर्जतला सोमवारी (दि.19) पहाटे पावणे सहाच्या सुमारास आलेल्या चार जैन साध्वी व त्यांच्याबरोबर असलेल्या जैन महिला कर्जतहून नेरळकडे जात असताना मागून येणार्‍या भरधाव दुधाच्या टेंपोने तिघींना चिरडले होते. यामध्ये एक जैन साध्वी व एक जैन महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक भगिनी गंभीर जखमी झाली होती. जखमी झालेल्या जैन महिलेला पुढील उपचारासाठी पनवेलकडे नेण्यात आले होते. त्या महिलेचा बुधवारी (दि.21) मृत्यू झाला. त्या महिलेवर गुरुवारी (दि.22) अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघात झालेल्या दीपा उर्फ दिवाली राणावत-ओसवाल याच्यावर जैन धर्मशाळेत धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी जैन भगिनी उपस्थित होत्या. पालखीतून मिरवणूक काढून कर्जत स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version