संस्थेच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटाः चित्रलेखा पाटील

| अलिबाग | संतोष राऊळ |

शिक्षणाची गंगा गावागावात पोहोचविण्यासाठी आ. जयंत पाटील यांनी 23 वर्षांपूर्वी पीएनपी एज्युकेशन सोसायटी नावाची शिक्षण संस्था सुरु केली. शाळांचा निकालही चांगला आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबरच संस्थेच्या प्रगतीमध्ये शाळेतील कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी केले.

1 / 7

वेश्वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवारी (दि.17) करण्यात आले. चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडला. यावेळी खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, संतोष जंगम, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेश कडू, सुमेध खैरे आदी मान्यवरांसह विक्रांत वार्डे, प्राचार्य ओमकार पोटे, दिनेश पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

2 / 7

याप्रसंगी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, खेड्यापाड्यातील मुले शिकली पाहिजे या भूमिकेतून प्रभाकर पाटील यांनी शिक्षणाची चळवळ जिल्ह्यात सुरू केली. या चळवळीला आ. जयंत पाटील यांनी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या रुपाने मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले. गरीबांची मुले शिकली पाहिजेत या भूमिकेतून आ. जयंत पाटील यांनी शिक्षणाची कवाडं खुली केली.

3 / 7

शिक्षणाच्या लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्षाप्रमाणे विस्तर झाला आहे. यामध्ये सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्या ठिकाणी एखादे वाहनदेखील जाऊ शकत नव्हते, त्या दुर्गम भागात आ. जयंत पाटील यांनी शाळा सुरू केली. आज पीएनपी अंतर्गत 19 मराठी व 5 इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून तीन सीबीएससी, एक कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालय, तसेच बीएड विद्यालय आहे. पाचशेहून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संस्थेत काम करीत असून, आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रभाकर पाटील असते, तर आ. जयंत पाटील यांचे कार्य पाहून त्यांना नक्कीच आनंद झाला असता, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

4 / 7

शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातदेखील काम करण्यास सुरुवात केली आहे. अलिबाग तालुक्यात तीन क्रीडा संकुल उभारले आहेत. असे अजून चार संकुल बांधण्याचा मानस आहे. यातून अलिबागची क्रीडा चळवळ अधिक भक्कम करण्याचा एक प्रयत्न राहणार आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

5 / 6
विद्यार्थ्यांसह अनेकांचा गुणगौरव
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले, शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा, संस्थेत पहिल्या तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, 80 टक्क्यांच्या वर गुण प्राप्त करुन प्रथम आलेले विद्यार्थी, विषयानुसार संस्थेत प्रथम क्रमांक मिळविले विद्यार्थी, तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Exit mobile version