शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची उपस्थिती
। अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आझाद मैदानात पीएनपी चषकाचा महासंग्राम पहावयास मिळणार आहे. या निमित्ताने खेळाडूंचा लिलाव कुरुळ येथील क्षात्रैक्य माळी समाज हॉलमध्ये बुधवारी (दि.5) सकाळी अकरा वाजल्यापासून सुरु झाला आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी चषकाचे आयोजक नृपाल पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदिप नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे आदी मान्यवरांसह संघ मालक, संघाचे व्यवस्थापक, कर्णधार उपस्थित होते.
यावेळी, पाचशे रुपयांपासून ते 25 हजार पॉईंटपर्यंत लिलाव ठेवण्यात आला आहेत. दरम्यान, लिलाव प्रक्रियेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून एक वेगळा उत्साह या निमित्ताने दिसून येत आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप जगे यांच्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पीएनपी चषकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.