| उरण | वार्ताहर |
खोपटे गावात उरण तालुक्यातील युवक-युवतींसाठी दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी ठीक सकाळी 10.00 वाजता भव्य रोजगार मेळावा श्री. गोरख रामदास ठाकूर व मित्र परिवार आणि भाजप खोपटे यांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.
या संधीचा पुरेपूर लाभ घेऊन नोकरी मिळविण्याची संधी प्राप्त करून घ्यावी. मोठ्या संख्येने या रोजगार मेळाव्यासाठी उरण तालुक्यातील युवक- युवतींनी उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सोबत रजिस्ट्रेशनचा फ्रॉमची प्रिंट काढून 7 ऑक्टोबर ला भरून घेऊन यावी व सोबत आपला बायोटेटा घेऊन यावा किंवा कोणाला फॉर्म हवे असल्यास ते देण्यात येतील व बायोटेटा नसेल तर त्याची सुध्दा प्रत आपल्याला देण्यात येईल, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.