भाजी विक्रीतून आदिवासी महिलांना रोजगार

। पेण । प्रतिनिधी ।

पेण तालुक्यातील आदिवासी समाज डोंगर दर्‍यात, माळरानांवर पालेभाज्या व फळभाज्या या तीन महिन्यात तयार होतील अशाच बेताने लावत असतात. या ताज्या भाज्या सकाळी पेण नगरपालिकेच्या समोरील कोतवाल चौकात भल्या पहाटेपासून आदिवासी महिला विक्रीसाठी येत असतात.

यामध्येकासमाळ, महलमिरा डोंगर, चांदेपट्टी, पाबळखोरे, जावळी, निधवली, धरणाची वाडी, तांबडी, खैरासवाडी या गावातील भाजी विक्रेत्यांचा समावेश असतो. स्वस्त व ताजी भाजी खवैय्यांसाठी उपलब्ध होत असल्याने भल्या पहाटे पेण शहरातील व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नगरीक ही भाजी खरेदीसाठी नगरपालिकेच्या कोतवाल चौकात येत असतात. महत्वाची बाब म्हणजे ठाकुर समाजातील तरुण-तरुणी खूप मेहनत घेउन पहाटे उठून भाजी विक्रीसाठी पेणमध्ये येतात. त्या भाज्यांमध्ये दुधी, पडवळ, वांगी, काकडी, भेंडी, कारली, घोसाळी, आळूची पाने, माठ, मूळा, यासारख्या फळभाज्या, व पालेभाज्या विक्रीसाठी आणतात. त्यांच्या या मेहनतील खवैय्ये देखील दाद देउन बार्गेनिंंग न करता भाज्या खरेदी करतात. सकाळी 5 ते सकाळी 8 वाजेपर्यंत कोतवाल चौकात या ताज्या भाजीपाला उपलब्ध होतो. त्यामुळे आदिवासी समाजाला भाजी विक्रीतून चांगला फायदा होताना दिसतो.

कुटुंबाचे उदनिर्वाह होण्यासाठी पहाटे पेणच्या बाजारात डोक्यावर भाजीची पाटी घेउन येत असते. कुटुंबातील सदस्य दिवसभर रानामध्ये लावलेल्या भाजीची मशागत करतात. यावर कुटुंबाचे उदनिर्वाह होते.

बारकु नरेश वाघमारे, भाजी विक्रेती कोट

गेली कित्येक वर्ष पावसाळयात डोंगर काठीला जितराप (भाजीचे मळे) लावतो. भाजी विकल्याने चांगले पैसे मिळतात.


गौरी शांताराम वाघमारे, भाजी विक्रेती
Exit mobile version