महिलांचे सबलीकरण आवश्यक: प्रा. डोंगरगावकर

| पनवेल | प्रतिनिधी |
देशहितासाठी महिलांचे सबलीकरण आवश्यक आहे, असे विचार प्रा. डॉ. जी.के. डोंगरगावकर यांनी व्यक्त केले. खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयात हक्क आणि सामाजिक संस्थांची जबाबदारी या विषयावर त्यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या परिसंवादात महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी परिसंवादाचे उद्घाटन प्रा. वनिता सूर्यवंशी यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई आंबेडकर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला वंदन केले. प्रा.डॉ. निधी पटेल, प्रा. एलोरा मित्रा, प्रा. संगीता जोगदंड, प्रा. ललिता यशवंते, प्रा. सुनिता वानखेडे यांनीही परिसंवादात विचार मांडले.

डॉ. जी.के. डोंगरगावकर यांनी स्त्रियांना सर्वस्तरावर व सर्व प्रकारचे शिक्षण मोफत देण्याची आवश्यकता असल्याचे मत स्पष्ट केले. या कार्यक्रमात सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय, सिद्धार्थ हायस्चूल, अजिंठा स्कूल, डॉ. जी.के. डोंगरगावकर आदींचे शिक्षक सहभागी होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रा. सोनाली सूर्यवंशी यांनी आभार मानले.

Exit mobile version