| छत्तीसगड | वृत्तसंस्था |
बीजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे पोलिस आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत बीजापुर जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी)च्या एका जवानाने वीरमरण पत्करले आहे. तसेच, 22 माओवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चकमकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला असून, संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
बीजापुर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवाद्यांविरोधात अभियान राबवले जात होते. याच दरम्यान आज सकाळी सुमारे 7 वाजता नक्षलवाद्यांनी सुरक्षादलांवर अचानक हल्ला चढवला, आणि दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. या चकमकीत नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले.