। श्रीनगर । वृत्तसंस्था ।
जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यातील कंडी भागात शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. तर एका अधिकार्यासह चार जण जखमी झाले आहेत. तसेच या चकमकीत दहशतवादीही मारले जाण्याची शक्यता आहे. तर जखमी जवानांना कमांड हॉस्पिटल उधमपूरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या सोबतच सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट सेवा सध्या बंद करण्यात आली आहे. लष्कराच्या उत्तरी कमांडच्या हवाल्याने सांगण्यात आले की, ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला ज्यात दोन जवान शहीद झाले आणि चार जखमी झाले. जखमींमध्ये एका अधिकार्याचा समावेश आहे.