ठाकरे गटाचे सहा. पोलीस आयुक्तांना निवेदन
| पनवेल | वार्ताहर |
राज्यात स्त्री शक्ती कायदा लागू करा यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांची भेट घेऊन जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना निवेदन दिले.
सन 2023 मध्ये राज्यात महिलांवर सतत होणार्या अत्याचारांचा विचार करता राज्यात बलात्काराच्या 7,521 घटना, अपहरणाच्या 9,698 घटना, हुंडाबळीच्या 169 घटना, नातेवाईकांकडून क्रूर पद्धतीने त्रासाच्या 11,226 घटना, विनयभंग, लैंगिक अत्याचार 17,281 घटना घडल्या आहेत. तसेच मुंबईमध्ये मे 2024 अखेर महिन्यात बाललैंगिक अत्याचार घटनेसंदर्भात 509 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. सदरची आकडेवारी ही चिंताजनक असून, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. वारंवार महिलांवर होणार्या अत्याचाराविरोधात स्त्री शक्ती कायदा अंमलात आणण्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पनवेल परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांची भेट शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत, महानगर समन्वयक दीपक घरत, मुंबई महानगरपालिका मा. महापौर व पुणे शहर संपर्क संघटक स्नेहल आंबेकर, माजी नगरसेविका तथा राजापूर तालुका-संपर्क संघटक समिक्षा सक्रे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक नेहा माने, माजी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्रेया परब, माजी महापौर, जिल्हा संघटीक कल्पना पाटील, उपजिल्हा संघटीका रेवती सकपाळ, तालुका संपर्क संघटिका प्रमिला कुरघोडे, तालुका संघटिका अनिता डांगरकर, शहर संघटिका पनवेल अर्चना कुळकर्णी, शहर प्रमुख प्रवीण जाधव, कुणाल कुरघोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.