| लंडन | वृत्तसंस्था |
इंग्लंडने दुसऱ्या कसोटीतही निर्विवाद वर्चस्व गाजवताना वेस्ट इंडिजवर 241 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरी कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या विजयामुळे इंग्लंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत मोठी झेप घेताना पाकिस्तानचे टेंशन वाढवले आहे.
या कसोटीपूर्वी इंग्लडचा संघ गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर होता, परंतु, दुसरी कसोटी चौथ्या दिवशी जिंकून त्यांनी तीसऱ्या स्थानावर झेप घेतली. फिरकीपटू शोएब बशीरने (5-41) कसोटी कारकीर्दित तिसऱ्यांदा डावात पाच बळी घेतले. त्याच्या फिरकीसमोर 385 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेला वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 143 धावांत तंबूत परतला.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील 416 धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजने 457 धावा केल्या. पण, इंग्लंडने दुसऱ्या डावात जो रूट (122) व हॅरी ब्रूक (109) यांच्या शतकाच्या जोरावर 425 धावा केल्या. वेस्ट इंडिजसमोर 385 धावांचे लक्ष्य ठेवले गेले, परंतु त्यांना 143 धावा करता आल्या. बशीरच्या 5 बळींसह ख्रिस वोक्स व गस ॲटकीसन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या विजयासह इंग्लंडने कसोटी क्रमवारीत तीसऱ्या स्थानावर झेप घेताना सहावा क्रमांक पटकावला.