सहलीद्वारे पक्षी निरीक्षणाचा आनंद

| पाली | वार्ताहर |

थंडीची चाहूल लागली कि जिल्हा पर्यटकांच्या वर्दळीने गजबजून जाते. याच दिवसात प्रत्येक शाळेच्या सहली निघण्यास सुरुवात होतात. यामध्ये बर्‍याच शाळा जिल्ह्याला पहिली पसंती देतात आणि समुद्रकिनारे व गडकिल्ले तसेच धार्मिक स्थळांना भेटी देण्याची योजना आखतात. मात्र काही सहली जिल्ह्यातील जैवविविधता निसर्गाचा समृद्ध ठेवा व सौदर्याचा आनंद घेण्यासाठी व अभ्यासासाठी येत आहेत. अशाच प्रकारची सहल नुकतीच माणगाव तालुक्यातील पाटणूस परिसरात सोलापूर येथील शाळेची आली होती.

येथील निसर्ग अभ्यासक शिक्षक राम मुंडे यांनी सांगितले की गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांनी महात्मा फुले शाळा सौंदरे, तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम घेतला होता. छोट्या-छोट्या विद्यार्थ्यांनी अगदी मनापासून कार्यक्रम पहिला होता. कार्यक्रम झाल्यानंतर या सर्व चिमुकल्यानां मुंडे यांनी त्यांच्या शाळेला भेट दिली.

त्यात त्यांनी अवतीभोवतीच्या निसर्ग, जंगल, पक्षी, देवराई व गिधाडांची घरटी दाखवली आणि त्यांची माहिती दिली निसर्गाचा हा सर्व समृद्ध ठेवा पाहून सर्व पाहुणे अचंबित झाले. अशा प्रकारे एक वेगळी अशा निसर्ग सहलीची आनंद घेतला.

Exit mobile version