हिरवळ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रबोधन

| माणगाव | वार्ताहर |

हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स महाडमध्ये देशाच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयात हा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी सोनाली धारिया, संतोष बुटाला, वासंती राजप्पन, सुदेश कदम, राकेश वडवळकर, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी देशभक्तीच्या या उत्साहात सामील झाले. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सोनाली धारिया यांच्या हस्ते अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, समानता, बंधुत्व अश्या आपल्या राज्य घटनेतील विविध घटकांवर आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले.

Exit mobile version