बिर्ला ओपस हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

आरोग्य विषयक जनजागृतीसाठी आयोजन

| महाड | उदय सावंत |

महाडमध्ये बिर्ला ओपस या कंपनी समूहाकडून रविवारी (दि.1) हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून सुमारे 2 हजारहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. सुरुवातीला 21 किलोमीटर अंतर असलेल्या गटाला मॅरेथॉन ॲम्बेसेडर मिलिंद सोनम यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.


बिर्ला ओपस या कंपनी समूहाकडून रविवारी सकाळी 6.00 वाजता महाड येथील भिलारे मैदानात हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये एकूण सहभागी 2,260 धावपटूंनी वर्गानुसार सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये 21 किमी टाइम्ड रनमध्ये 266, 10 किमी टाइम्ड रनमध्ये 441, 5 किमी टाइम्ड रनमध्ये 903, तर 3 किमी फन रनमध्ये 650 जण सहभागी झाले होते. यावेळी सीओओ अजित कुमार, व्ही.पी. ऑपरेशन्स आनंद सिंग, प्यार विभागाचे अरुण शिर्के, युनिट हेड महेंद्रसिंग शेखावत, महाडचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर, उपनगराध्यक्ष संदीप जाधव, पोलीस निरीक्षक संदीप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत फिटनेस आयकॉन मिलिंद सोनव, कॉम्रेड मॅरेथॉन रनर सतीश गुजरात आणि अल्ट्रा मॅरेथॉन रनर सोफिया सुफी यांची विशेष उपस्थिती आकर्षणाचा विषय ठरली.

दरम्यान, 5 किमी स्पर्धेत महिलांच्या 12 ते 25 वयोगटातून पूजा सावंत, 26 ते 40 वयोगटातून स्वाती गुजर व 41च्या पुढील वयोगटातून माधुरी शिवदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पुरुषांच्या 12 ते 25 वयोगटातून संदीप जोशी, 26 ते 40 वयोगटातून संदीप कुमार व 41च्या पुढील वयोगटातून श्रीनिवास पांडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 10 किमीच्या स्पर्धेत महिलांच्या 16 ते 25 वयोगटातून संतोषी नराले, 26 ते 35 वयोगटातून प्रिया शिंदे, 36 ते 45 वयोगटातून मिनाज नदाफ, 46 ते 55 वयोगटातून वैशाली गायकवाड व 56च्या पुढील वयोगटातून शिल्पा भन्साळी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पुरुषांच्या 26 ते 35 वयोगटातून अमोल ताम्हणकरे, 36 ते 25 वयोगटातून योगेश जाधव, 46 ते 55 वयोगटातून जयनाथ शिंदे, 56 ते 65 वयोगटातून घनश्याम पद्मगिरी व 66च्या पुढील वयोगटातून बजरंग चव्हाण यांनी विजय मिळवला. हाफ मॅरेथॉनच्या 21 किमी स्पर्धेत महिलांच्या 18 ते 25 वयोगटातील साक्षी पवार, 26 ते 35 वयोगटातील उर्मिला बाणे, 36 ते 45 वयोगटातील स्मिता शिंदे, 46 ते 55 वयोगटातील अनिता पाटील, 56 ते 65 वर्ष वयोगटातील संगीता उबाळे व 66च्या वरील वयोगटातील तुलात कामत यांनी विजय मिळवला. पुरुषांच्या 18 ते 25 वयोगटातील स्वप्निल कोचाल, 26 ते 35 वयोगटातील रामू पारधी, 36 ते 25 वयोगटातील सुभाष पवार, 46 ते 55 वयोगटातील रवींद्र जगदाळे, 56 ते 65 वयोगटातील उदय बोभाटे आणि 66च्या पुढील वयोगटातील जयकुमार गोसावी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत विजय पटकावला आहे.

Exit mobile version