| पनवेल | वार्ताहर |
पनवेल, उरण परिसरातील मराठी यशस्वी तरुण उद्योजक व आई इन्फ्रा कंपनीचे भागीदार ब्रह्मानंद पाटील यांना महाराष्ट्रातील यशस्वी युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्याचाही व्यवसायिक बांधवांनी व कुटुंबीयांनी सदस्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी नाशिक येथे मोठ्या दिमाखात पार पडलेल्या रिसेल डॉट इन या उद्योग समूहाच्या वतीने महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात यशस्वी गरुडभरारी घेणार्या उद्योजकांचा बिजनेस एक्सलंट अवार्ड हा पुरस्कार प्रार्थना बेहेरे यांच्या शुभहस्ते ब्रह्मानंद पाटील यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.