| रसायनी | वार्ताहर |
माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून वंचित आघाडीचे जिल्हा पदाधिकारी राम झिने यांच्यासह पारधी समाज अध्यक्ष मधुकर पवार, मातंग समाज नेते संग्राम तोगरे, अरुण मस्के, समीर शाह, महेंद्र पाटील, विठ्ठल काळे, शंकर पवार, किरण पवार, प्रदीप शिंदे, अर्जुन पवार व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत त्यांचे स्वागत केले.