किंजळोली मोहल्ल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश

| महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्याच्या राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण तसेच काँग्रेसचा बालेकिल्ला असणार्‍या किंजळोली मोहल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आ.भरत गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास ठेवून बहुसंख्येने शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याने या भागातील काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.

या प्रवेश कार्यक्रमच्या निमित्ताने झालेल्या गावांतील छोटेखानी कार्यक्रमामध्ये विजय सावंत, सुरेश महाडिक, राजु देशमुख, अनिल पवार, तेजस पाटणे, जयवंत जाधव, राजू रेंगे, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे गटामध्ये आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये अलीम लांडगे, रफिक कारविनकर, रशीद लांडगे,अतिफ पालेकर, अब्दुल समद कारविनकर, मुश्ताक पालेकर,असिफ कारविनकर, अस्लम कारविनकर, शहेबाज चिपळूणकर, सिमाब लाडगे, रियाज कारविणकर आदी 50ते 60 मुस्लीम प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

Exit mobile version