पिल्लई कॅम्पसतर्फे एनव्हिजन

| पनवेल | वार्ताहर |

महात्मा एजुकेशन सोसायटीच्या पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पसतर्फे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एनव्हिजन 2023 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व तांत्रिक अशा विविध प्रकारच्या एकूण 32 स्पर्धांचा समावेश होता. यावेळी जिल्ह्यातील जवळपास 50 हुन अधिक शाळांनी तर हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रश्‍नमंजुषा, हस्ताक्षर, निबंध लेखन, शुद्धलेखन, गणित ऑलिम्पियाड, विज्ञान परिषद, व्यवसाय योजना, नृत्य, गायन, फॅशन शो, चित्रकला, रांगोळी, एकपात्री अभिनय, हस्तकला, छायाचित्रण, मेहेंदी, पाककला, कविता लेखन, बास्केटबॉल, बॉक्स क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल या स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमास खालापूर विभाग पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमाळे, केंद्रप्रमुख किशोर परदेशी, डॉ. निवेदिता श्रेयांस, डॉ. लता मेनन, डॉ. जे डब्लू बाकल, सुचिता सयाजी, अमर मांगे, ममता पाटील, रिमा निकाळजे, गणेश शिंदे, दिलीप महाडिक यांची उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात परंतु शांततेत संपन्न झाला.

Exit mobile version