‘ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीतून स्मारके उभी करा’

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याच्या सुपुत्रांनी हरिओम या ऐतिहासिक व प्रेरणादायी चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींच्या मावळ्यांचा इतिहास जागर केला आहे. तानाजी मालुसरे, आणि सूर्याची मालुसरे यांचे घर उभारण्यासाठी अभिनेते हरीओम घाडगे आपल्या चित्रपटाच्या उत्पन्नातील काही भाग याकरता खर्च करणार असल्याचे समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक संजय यादवराव यांनी सांगितले.

ऐतिहासिक चित्रपट नसतानाही अशा स्वरूपाचा संकल्प हरीओम घाडगे हा मराठी तरुण करतो ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर चालावा आणि या मराठमोळ्या मावळ्यांना खूप प्रतिसाद मिळावा याकरता निश्‍चितच समृद्ध कोकण संघटना या तरुणांबरोबर प्रयत्न करणार आहे.

रायगडात या चित्रपटाचा प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला संपूर्ण कोकणात आणि त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रात हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे,असे त्यानी जाहीर केले.

Exit mobile version