। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लायन्स क्लब मांडवा आयोजित ग्रुप ग्रामपंचायत झिराड व राजिप उच्च प्राथमिक शाळा झिराड यांच्या सहकार्याने रविवार (18) रोजी हिंदी निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन झिराड ग्रुप ग्रामपंचायत सरपंच दर्शना दिलीप भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. 14 सप्टेंबर रोजी हिंदि राष्ट्रभाषा दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त स्पर्धेचे आयोजन केले होते. याप्रसंगी लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, सुमित पाटील, विलास पाटील, धवल राऊत, मोहन पाटील, अजय आंगणे, ऋग्वेद ठाकूर, सतीश म्हात्रे, विद्या अधिकारी, उज्वला पाटील, निकिता पाटील, मृदुला राऊत, मीनल ठाकूर, सारिका पाटील, प्रीती पाटील, सुजाता माने, कीर्ती माने, अनिता ठाकूर, संध्या गावडे, सुभाष झिराडकर, उल्हास भोईर, महेश माने, जयवंत साळुंखे, अशोक थळे, प्राथमिक शाळा झिराडचे शिक्षकवृंद शेळके व रुपाली ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा 5 वी ते 7 वी प्रथम गट तसेच 8 वी ते 10 वी दुसरा गट अशा दोन गटात आयोजित केली होती. या दोन्ही गटात सारळ माध्यमिक शाळा, सारळ, बा. ना. हायस्कूल, आवास, रा.जि.प. उच्च प्राथमिक शाळा, झिराड, डेव्हिड इंग्लिश मिडीयम स्कूल, लक्ष्मी नारायण विद्या मंदिर, टाकादेवी, पी. एन.पी. शाळा, वायशेत, को.ए.सो. भाऊसाहेब राऊत हायस्कूल, नवगाव, स.म. वडके विद्यालय, चोंढी, धनुर्धर खोपकर माध्यमिक शाळा, परहूर या 9 शाळांमधून 47 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समांरभ लवकरच करण्यात येणार असून प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय असे अनुक्रमांक देऊन प्रत्येक गटात दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत, तसेचसर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.