साखरचौथच्या गणरायाची स्थापना

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा श्रीबाग नागरी सेवा संघटना आणि ऑल कॅप्टन ग्रुपच्यावतीने साखरचौथ गणपती बाप्पाची बुधवारी, (दि.10) उत्साहात स्थापना करण्यात आली आहे.

सतत पंधरा वर्षे श्रीबागमध्ये विविध प्रकारचे देखावे सादर करून अलिबागकरांसाठी हा गणपती बाप्पा आकर्षण ठरला आहे. यावर्षीसुद्धा संत तुकाराम यांचा सदेह वैकुंठ प्रवास यावर आधारित चलचित्र अलिबागकरांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. हजारो अलिबागकरांनी रात्री उशिरापर्यंत गणपती दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. देखाव्याला साजेशी गणपती मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सुहास बागडे यांनी देखावा सदर केला आहे, तर राकेश थळे यांनी इतर सजावट केली आहे. श्रीबाग नागरी सेवा संघटना आणि ऑल कॅप्टन ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हा गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. बाप्पाची विसर्जन मिरवणूकसुद्धा विशेष देखाव्यामुळे खूप आकर्षणाची ठरणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

Exit mobile version