शेकाप नगरसेवक शंकर म्हात्रे यांची मागणी
I पनवेल I प्रतिनिधी I
पनवेल महानगरपालिका हद्दीत कामोठे शहरात नागरी वस्ती वाढली असून, गणपतीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधावेत, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक शंकर म्हात्रे यांनी सिडकोकडे केली आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर मुंबईतील नागरिक मोठ्या प्रमाणात खारघर, कळंबोली, खांदा कॉलोनी आणि कामोठे परिसरात स्थलांतरित झाले आहेत. यामुळे या नागरिकांसाठी गणपती विसर्जनासाठी गैरसोय होत आहे.
कामोठे विभागात गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी कामोठेमध्ये फक्त एकच तलाव आहे आणि सेक्टर 05 मध्ये दुसरा कृत्रिम तलाव आहे. मात्र, या तलावात केमिकलचे खराब पाणी येत आहे. यामुळे कामोठेमधील नागरिकांची गणपती विसर्जनसाठी मोठी गैरसोय होत आहे. तेव्हा नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी कामोठेमध्ये आणखी दोन ते तीन कृत्रिम तलाव बनवावे, अशी मागणी शेकापचे नगरसेवक शंकर म्हात्रे यांनी केली आहे.