सावर्डे येथे अलगीकरण कक्षाची स्थापना


चिपळूण | प्रतिनिधी |
माझे गाव माझी जबाबदारी योजनेअंतर्गत कोरोणा विषाणूची साखळी तोडण्यासाठी आ.शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायत,सावर्डे यांच्या माध्यमातून आय.टी.आय.कँम्पस वहाळफाटा या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.यावेळी प्रांताधिकारी श्री.पवार,डीवायएसपी श्री.बारी,तहसिलदार श्री.सुर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी सौ.ज्योती यादव, माजी सभापती पुजा निकम,आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी तसेच सावर्डे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामकृती दलाचे सदस्य आणि गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.अलगीकरण कक्षामधील रूग्नांसाठी जेवणाचा सोय ग्रामपंचायतीने केलेली आहे, वाचनासाठी पुस्तके ठेवण्यात आलेली आहेत, तसेच रुग्णांच्या मनोरंजनासाठी टीव्ही ,म्युझिक सिस्टीम,चित्र काढण्याची सोय तसेच पिण्यासाठी व अांघोळीसाठी गरम पाण्याची सोय व साध्या पाण्याची तसेच वाफ घेण्यासाठी वाफेच्या मशीनची सोय आहे.सावर्डे येथील अलगीकरण कक्ष सर्व सोयीयुक्त व परिपुर्ण ग्रामपंचायतीने केलेले आहे.

Exit mobile version