| कर्जत । वार्ताहर ।
कशेळे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीचे औचित्य साधून संसार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्किलटेक टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली आहे. 10 वी 12 वी पास नापास तरुण शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उदघाटन समारंभ प्रसंगी संजू रणदिवे, सारिका रणदिवे, रिया गायकवाड, विजय रणदिवे, विशाल उबाळे, कल्पना म्हात्रे, हरिश राणे, ऋषिकेश राणे, अक्षय तिटकरे, रोहन सावंत, ऋषिकेश सावंत, शुभम मराठे, वृक्षाली थोरवे, राहुल गायकवाड, तुकाराम वाघमारे, मुकुंद गायकवाड, गौरव भोईर, नितीन जाधव,नितीन मोहिते आदी उपस्थित होते.
आजपर्यंत संसार सामाजिक संस्था व जन शिक्षण संस्थान अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022 ते 2023 या कालावधीत 120 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून स्वावलंबी केलें आहे. व यापुढे प्रशिक्षणार्थी यांना एकाच छताखाली वेगवेगळया उपक्रमांचा लाभ घेता यावा म्हणून कशेळे या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे. असे विजय रणदिवे यांनी स्पष्ट केले. संगणक प्रशिक्षक म्हणून स्वप्नाली विजय रणदिवे, नितेश सावंत, योगेश राणे हे प्रशिक्षण देणार आहेत.