एप्रिलमध्येही चटकेच चटके

। मुंबई । प्रतिनिधी ।
दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या उन्हाच्या तीव्रतेने अंगाची लाही लाही होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्यात एप्रिल महिन्यात उन्हाळा अधिक तीव्र असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील किमान आणि कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहिल, असे देखील हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र येथे यंदा पाउसही जास्त राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यातल्या कमाल आणि किमान तापमानात वाढ पाहण्यास मिळू शकते असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. याशिवाय यंदा कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊसही सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, तसेच मराठवाड्याती काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद केली जाऊ शकते.

Exit mobile version